Kirit Somaiya : भाजपचा एक-एक कार्यकर्ता किरीट सोमय्यांच्या पाठीशी : भाजप पदाधिकारी ABP Majha
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. आधी अनिल परब, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड नंतर हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी म्हटलं की, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे.