BJP on BMC Election : भाजप गुजराच्या विजयाची लाट मुंबई मनपात आणणार?

गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक आणि विक्रमी विजय मिळवल्यानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळालीय. गुजरातच्या याच विजयाची लाट मुंबई महापालिकेपर्यंत आणण्यासाठी भाजप आता प्लॅन आखतंय. गेल्या काही दिवसांत भाजपच्या नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसलीय. मुंबई महापालिकेच्या सत्तेतून उद्धव ठाकरेंना दूर करण्यासाठी आशिष शेलारांसह भाजपचे इतर नेते कामाला लागले आहेत. गुजरातने दिलेला आत्मविश्वास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपसाठी फायद्याचा ठरू शकतो. मुंबईतील गुजराती मतदारांचा प्रभाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा याचा पुरेपूर वापर भाजप मुंबई मनपा निवडणुकीत करू शकतो. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola