BJP | मुंबईतील भाजपच्या कार्यालयामध्ये शांतता | ABP Majha
Continues below advertisement
महाविकासआघाडीचं सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरत असताना तिकडे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपात शांतता पसरली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयात सध्या शुकशुकाट आहे. भाजपच्या एकाही नेत्याकडून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं जातं नाही. महिन्याभरापूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यालयात जल्लोषाच्या तयारी झाली होती. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली होती. स्टेज बांधला होता. दोन एलईडी लावले होते. परंतु त्याच्या उलट चित्र आज महिन्याभराने पाहायला मिळत आहे. सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करता न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. परिणामी पक्ष कार्यालयाबाहेर शांतता पाहायला मिळत आहे.
Continues below advertisement