Sanjay kakade | भाजप खासदार संजय काकडेंनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद | ABP Majha
Continues below advertisement
शिवभोजन योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा वाढणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे निधी मागावा, अशी मागणी भाजप खासदार संजय काकडेंनी केली आहे.
राज्यातील 13 कोटी लोकसंख्येपैकी किमान 2 कोटी गरीब जनतेने रोज शिवभोजन थाळीचा लाभ घेतला तरी राज्य सरकारवर दिवसाला 60 ते 65 कोटींचा आर्थिक बोजा पडेल असा काकडे यांचा दावा आहे. शिवाय तामिळनाडूमध्ये देखील अशाचप्रमाणे योजना सुरू असून तिथल्या सरकारला वर्षाला ३७ हजार कोटींचा फटका बसत आहे, शिवाय केंद्रांवरील कर्मचारी धान्यांमध्ये अफरातफर करत असल्याचंही समोर आल्याचं काकडेंचं म्हणणं आहे.