Neil Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची पोलीस चौकशी

मुंबई : मुंबईतील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र, नगरसेवक नील सोमय्या यांना काल मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांनी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. तसेच मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती, पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील सोमय्या यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सचं काम एका खासजी ठेकेदाराला दिलं होतं. परंतु, नील सोमय्या यांनी ठेकेदाराला धमकावून ते काम आपल्या ओळखीतल्या एका ठेकेदाराला मिळवून दिलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन लोकांना अटकही केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola