Kirit somaiya | शिवसेनेकडून जीवाला धोका : किरीट सोमय्या | ABP Majha

किरीट सोमय्या म्हणाले, आतापर्यंत कधी भीती वाटली नाही आणि यापुढेही वाटणार नाही. मी अनेकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात काम यापुढेही सुरुच राहील, माझं जे काम आहे ते मी सुरुच ठेवणार आहे. तसंच आपण असल्या धमक्यांना भीक घालत नाही. दरम्यान या धमकीबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे का ? असे विचारले असता आपण मुख्यमंत्र्यांना अशी माहिती दिली नाही. मात्र भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola