देवांग दवेनं घेतली अजित पवारांची भेट, जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई : भाजप सरकारच्या काळात निवडणूक आयोगाने कंत्राट दिल्याचा आरोप असलेला भाजप आयटी सेलचा देवांग दवे काल मंत्रालयात येऊन भेटून गेला. विशेष म्हणजे देवांग दवेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य काही मंत्र्यांना भेटल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. आव्हाड यांनी तो देवांग दवे आहे हे माहीतच नव्हतं असं स्पष्टीकरण दिलं आहे.