भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी Kripashankar Singh, निवडणूकांच्या तोंडावर महत्वाची जबाबदारी : ABP Majha

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीत क्लीनचीट मिळाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांना भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलीय. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय मतांचा विचार करून कृपाशंकर यांना भाजपनं महत्त्व दिलंय. कृपाशंकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी आग्रह धरला होता. पण त्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर मुंबई, ठाणे परिसरातील उत्तर भारतीय मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola