Biparjoy Cyclone : चक्रीवादळामुळे मुंबईचा समुद्र खवळला, पुढील 2 दिवस वादळी वारे, पावसाची शक्यता

Continues below advertisement

बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल जरी गुजरातमध्ये होणार असला, तरी त्याचे परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही जाणवतायेत. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबारमध्ये तुफान वेगानं वारे वाहणार आहेत, तसंच पावसाची देखील शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. हवामानात अनुकूल बदल होत असला तरीदेखील मान्सून पुढे सरकलेला नाही. पुढील दोन दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, तो १८ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram