बिहारमधल्या मुलाच्या अपहरण प्रकरणी मुंबईत आरोपीला बेड्या; अपहरण करुन कुटुंबीयांकडे 20 लाखाची मागणी
बिहारमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबीयांकडे मुंबईवरुन 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली असून त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रियासुद्दीन अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यासह बिहार पोलिसांनी बिहारमध्ये खान मुहंमद अन्सारी, अलाउद्दिन अन्सारी आणि मुस्लिम अन्सारी या आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.