Bhiwandi : भिवंडीमध्ये शिवकालीन शस्त्रांस्रांचं प्रदर्शन; ऐतिहासिक नाणी, दुर्मिळ कागदपत्रांचा संग्रह
Continues below advertisement
Bhiwandi : भिवंडीमध्ये शिवकालीन शस्त्रांस्रांचं प्रदर्शन; ऐतिहासिक नाणी, दुर्मिळ कागदपत्रांचा संग्रह भिवंडीकरांचा गौरव असलेल्या ब्राह्मण आळी सार्वजनिक गणेशोत्सवाकडून यावर्षी शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं.. शिवराज्यभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. ब्राह्मण आळीमधील नवभारत शाळेच्या दांडेकर सभागृहामध्ये श्रीदत्त राऊत यांच्याकडील वस्तूंचा हा संग्रह नागरिकांसाठी खुला करण्यात आला. यामध्ये ऐतिहासिक नाणी, मोडी लिपी कागदपत्रं, जुना शस्त्र संग्रह, दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. यंदाचं या मंडळाचं हे ११८ वं वर्ष आहे.. गेली अनेक वर्ष समाजाभिमुख उपक्रम आणि कार्यक्रम या मंडळाकडून राबवले जातात
Continues below advertisement