Bhiwandi Potholes : माझाच्या बातमीनंतर रातोरात दुरुस्तीचं काम, एका आठवड्यात सात अपघात

Continues below advertisement

भरधाव रिक्षा खड्यात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर घडली आहे. विशेष म्हणजे या अपघातापूर्वीच याच खड्यात एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने अपघाताचा केंद्र बिंदू असलेल्या खड्डा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनतर हा व्हिडिओ वाऱ्या सारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram