Bhiwandi Night Curfew | भिवंडीत पहिल्याच दिवशी संचारबंदीची कडक अंमलबजावणी
भिवंडी : राज्य सरकारने मंगळवारपासून सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील पोलीस विभागांकडून चौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. वंजार पट्टि नाका, साईबाबा, कल्याण नाका,धामणकर नाका ,अंजुरफाटा बाजारपेठ परिसरात पोलिसांनी बॅरीगेटिंग करून नाकेबंदी लावली होती येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची चौकशी करून त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिले जात होते. तसेच परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली होती. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना अडवणूक करून त्यांची विचारपूस केली जात होती. मात्र या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या भाजीपाला, दूध ,मेडिकल, औषध विक्री यांसारख्या वाहनांना मुभा होती. मात्र विनाकारण फिरनाऱ्यांवर पोलीस कारवाई देखील करणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व सूचनांचे पालन याठिकाणी केले जात असून नागरिकांनी या नाईट कर्फ्यूमध्ये सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त केजी गावित यांनी यावेळी केलं आहे.