Bhiwandi Fire | भिवंडीत झेंडा नाका परिसरात भांड्याच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी शहरातील झेंडा नाका परिसरात भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर सदरील आग लागली असून इमारती मधील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यास यश आल आहे. शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलंय. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसती तरी गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे.