Bhiwandi Building Collapse | इमारत धोकादायक होती, याआधी नोटीस दिली होती : प्रत्यक्षदर्शी

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. 
शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड इथली ही तीन मजली जीलानी इमारत पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 25 कुटुंबातील 70 ते 80 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola