Bhiwandi | भिवंडीत एका तासात 40 दुचाकी स्वारांचा अपघात; 25 जण जखमी | ABP Majha
भिवंडीतील चाविन्द्रा मार्गावर पोगाव गावाच्या परिसरात एका तासात 35 ते 40 दुचाकी स्वारांचा घसरून पडल्याने अपघात झाला. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, चाविन्द्रा मार्गावर पोगाव गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दारू भट्टीचं (बियरचा) वेस्टेज मटेरियल एक ते दीड किलोमीटरपर्यंत सांडल्याने हे अपघात झाले आहेत.