Air Pollution | प्रदूषणामुळे 7 लाख भिवंडीकरांचा जीव धोक्यात | भिवंडी | ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीप्रमाणेच भिवंडीत देखील वायू प्रदूषणाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील रहिवाशांना या प्रदूषणाचा अतोनात त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. भिवंडी शहरात असलेले डाईंग व सायजिंगच्या चिमण्यांमधून निघणारा काळाकुट्ट धूर व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून निघणारी धूळ यामुळे भिवंडीकरांना शहरात फिरणे कठीण झाले आहे. भिवंडीकर या वायुप्रदूषणामुळे विविध आजारांना बळी पडतायेत. मात्र, मनपा प्रशासनाचं तसेच प्रदूषण विभागाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
Continues below advertisement