Bharat Shah : रवींद्र वायकरांविरोधात भरत शाहांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
Bharat Shah : रवींद्र वायकरांविरोधात भरत शाहांची मुंबई उच्च न्यायालयात धाव उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत शहा रवींद्र वायकर यांच्या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार रवींद्र वायकर यांचा विजय शंकास्पद त्यामुळे चौकशी करून जोपर्यंत निर्णय दिला जात नाही तोपर्यंत वायकर यांना खासदारकीच्या शपथविधीपासून थांबवावे भरत शाह यांची मागणी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांची निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे. तिथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही... त्यामुळे लोकसभेत खासदार रवींद्र वायकर यांना शपथ देण्यात येऊ नये, या संदर्भात लोकसभेच्या सरचिटणीस यांना याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी पत्र पाठवल्यानंतर या सगळ्या संदर्भात शाह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे... निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाचा वापर केल्याचा आरोप भरत शाह यांनी केला आहे. सोबतच या सगळ्या प्रकरणांमध्ये दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला असताना खासदार रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ घेणे संविधानिक ठरणार नसल्याचे भरत शहा यांनी आपल्या मागणीमध्ये म्हटले आहे दुपारी बारा वाजता याचिका दाखल करणार आहेत.. वकील असीम सरोदे सोबत असतील