Bharat Band | देशव्यापी संपाचा मुंबईवर फारसा परिणाम नाही | मुंबई | ABP Majha
कामगारांच्या अनेक संघटनांच्या वतीनं आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. मुंबईवर सध्या तरी या बंदचा कुठलाही परिणाम नाही. मुंबईतील लोकल, रस्ते वाहतूक नियमितपणे सुरु आहे. बाजारपेठाही उघडायला सुरुवात झालीय. दादरमधील फुल मार्केटमध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती.