
BEST Workers Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ
Continues below advertisement
BEST Workers Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील हे कंत्राटी कर्मचारी सध्या आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम सध्या सर्वसामान्य जनतेवर पाहायला मिळतोय. त्यामुळे आझाद मैदानात सरकारच्या वतीने आज शिवसेना पक्षाचे सचिव किरण पावसकर आणि इतर पदाधिकारी गेले होते. कामगारांच्या या आंदोलनासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांनी आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच यावर तोडगा निघेल असा आश्वासन यावेळी पावसकर यांनी दिलं.
Continues below advertisement
Tags :
BEST