Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर
एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या पगारासाठी, महागाई भत्त्यांसाठी आणि मागण्यांसाठी आक्रमक झालेले असताना तिकडे मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मात्र गुड न्यूज आहे. मुंबई महापालिका या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देणार आहे. कर्मचाऱ्यांना पुढील 3 वर्ष 20 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. पालिकेचे १ लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टच्या 34 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी या निर्णयामुळे गोड होणार आहे.
Tags :
Bmc Msrtc Best Bus St Diwali 2021 MSRTC Protest ST Protest BEEST BEST Bus Workers BEST Diwali Bonus BEST Bonues BMC Bonus