Best Double decker last day : डबल डेकर बसची शेवटची फेरी, 86 वर्षाच्या सेवेनंतर रिटायरमेंट
Continues below advertisement
Best Double decker last day : डबल डेकर बसची शेवटची फेरी, 86 वर्षाच्या सेवेनंतर रिटायरमेंट
मुंबईच्या रस्त्यांवर गेली ८६ वर्षे दिमाखात वावरणारी बेस्ट उपक्रमाची डिझेलवर धावणारी डबल डेकर बस शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाली. बेस्टच्या डबल डेकर बसला मुंबईच्या इतिहासात मानाचं स्थान आहे. कारण या डबल डेकर बसशी प्रत्येक मुंबईकरांची भावनिक नाळ जोडलेली आहे. एका जमान्यात वरच्या मजल्यावरच्या पहिल्या दोन आसनांवर जागा मिळवणं हे तरुणाईचं खास आकर्षण होतं. अंधेरीच्या आगरकर चौकात मुंबईकरांनी आपल्या लाडक्या डबल डेकर बसला निरोप दिला. बेस्टच्या सेवेतून केवळ डिझेलवर धावणारी डबल डेकर बस निवृत्त झाली. पण काही महिन्यांपूर्वीच सेवेत आलेल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टच्या सेवेत कायम राहणार आहेत.
Continues below advertisement