Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEO

मुंबई : कुर्ला परिसरामध्ये सोमवारी संध्याकाळी बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असताना बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. अशात मनसेने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये बेस्ट बसचे कर्मचारी किती गंभीर आहेत याची प्रचीती येते. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेताना मनसेकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा दारू घेताना व्हिडिओ शेअर केला आहे. बेस्टचा बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. तिथून दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसला. महत्त्वाचं म्हणजे त्या बसमध्ये प्रवासी बसल्याचं दिसतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola