Navi Mumbai : बीडच्या व्यापाऱ्याला ट्रॅव्हल्स मधून उतरताच नवी मुंबईत लुटले, 18 लाख रुपये लंपास

खाजगी ट्रॅव्हल्स मधून बीड वरून कळंबोली येथे आलेल्या सोने व्यापार्याला लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 7:30 वाजता व्यापारी संतोष जाधव अंबाजोगाई मधून मुंबईला सोने खरेदी करण्यासाठी येत होते. सकाळी 7:30 वाजता कळंबोली सर्कल वर ट्रॅव्हल्स मधून उतरले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या चार आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकली. यानंतर चाकूने त्यांच्यावर वार करीत हातातील बॅग लंपास केली. यावेळी बॅगेत 18 लाख रूपयांची रोकड होती. सोने व्यापारी असलेले संतोष जाधव मुंबई मध्ये सोने खरेदी करण्यासाठी आले होते. गावाकडे सोन्याचा व्यापार असल्याने मुंबई मधून खरेदी करून गावाकडे घेवून जातात. त्यामुळे संतोष जाधव गावाकडून पैसे घेवून निघाल्याची माहिती आरोपींना मिळाली असल्याची शक्यता नाकारतां येत नाही.सद्या चार आरोपी फरार झाले असून या मध्ये अजून काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पनवेल डीसीपी झोन आणि क्राईम ब्रॅन्च संयुक्त तपास करीत आहेत. दरम्यान व्यापारी संतोष जाधव यांची प्रकृती सद्या चिंताजनक असून त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola