Manjara River | स्पेशल रिपोर्ट | मांजरा नदीच्या पाण्यात जीवापाड जपलेली जनावरं डोळ्यादेखत गेली वाहून
मांजरा नदीच्या महापुरा मध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेली. जीवपाड जपलेल्या जनावरांचे पाणी आल्यावर शेतकऱ्यांना दावे तोडून सोडून द्यावे लागले. महापुराने शेतकऱ्यांचे गोठे रिकामे केलेत. देवळा गावचे युवराज पवार हे आपल्या शेतातील गोठ्यामध्ये साचलेला चिखल बाहेर काढायचा प्रयत्न करतायेत. याच गोठ्यामध्ये तीन दिवसापूर्वी दहा जनावरे होते. महापूर आला आणि महापुराच्या पाण्यामध्ये आठ जनावरे वाहून गेले. ज्या जनावरांना जीवापाड जपले तेच जनावरे डोळ्या देखत वाहून गेले.