Mumbai : दुसऱ्या लाटेवेळी ठेवण्यात आलेल्या क्षमतेएवढ्या बेड्सची व्यवस्था करावी; BMC प्रशासन सतर्क
मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झालंय. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतिच नियमावली जाहीर केली असून बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांना आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवण्यास सांगितलंय. तसंच कोरोना रुग्णांकडून सरकारने निश्चित केलेले दरच आकारावेत, असा सूचनाही पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.