BDD Redevelopment | बीडीडी पुनर्विकास प्रकल्प चावी वाटप सोहळा, राजकीय व्यासपीठावर कोण-कोण?
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या निमंत्रण पत्रिका हाती लागली आहे. उद्या सकाळी अकरा वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची नावे निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत. तसेच, ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई यांचीही नावे निमंत्रण पत्रिकेवर आहेत. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाला होता. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाला गती मिळाली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांकडून या प्रकल्पाचे श्रेय घेतले जाणार आहे. स्थानिक आमदार आणि खासदार तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. व्यासपीठ सामायिक केले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.