BDD Chawl redevelopment | Aaditya Thackeray बीडीडी कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची शक्यता
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांचा चाबीवाटप कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता माटुंगाईच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे, मात्र ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा उल्लेख नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर स्थानिक आमदार आणि खासदार मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती मिळाली आहे. कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणे होणार आहेत.