BDD Chawl Redevelopment | ५५६ लाभार्थ्यांना चावीवाटप, श्रेयवादाची लढाई पेटणार!
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून ५५६ लाभार्थ्यांना आज चावीवाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता यशवंत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर महायुती सरकारने या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला गती दिली आहे. त्यामुळे या चावीवाटप कार्यक्रमात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ५५६ कुटुंबांना आज त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत. हा प्रकल्प मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. म्हाडाने या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.