BARC Scientist Death : मुंबईतील BARCच्या शास्त्रज्ञ मनीष शर्मा यांनी राहत्या घरात जीवन संपवलं

मुंबईतल्या BARC मधील 50 वर्षीय शास्त्रज्ञाने सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मनीष सोमनाथ शर्मा असं मृत शास्त्रज्ञाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांनी सोमवारी दुपारी 3 च्या दरम्यान आत्महत्या केली. पत्नीने शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने शर्मा यांना BARC रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola