Bappa Majha : गुजरातच्या कच्छचा प्रवास, देखाव्यातून साकारलं लीपन शैलीतलं घर Mumbai Goregaon
मुंबईत अनेक घरगुती गणपती कडून वेगवेगळ्या संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत येवगे कुटुंबीयांकडून गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेल्या कच्छ परिसरात लीपल देखावा करण्यात आला आहे.येवगे कुटुंबीयांकडून मागील 8 वर्षापासून पर्यावरण पूरक गणपती बाप्पा विराजमान होत असून दरवर्षी एक संदेश देणारा बाप्पांसाठी सजावट केला जातो.यावर्षी गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात पांढर्या रेतीपसून घरे तयार करण्यात येतात. स्थानिक आदिवासींच्या या बाहेरून गोलाकार आणि आतून पांढर्या रेतीमधे बांधलेल्या घरांना लीपन असं म्हटल जातं. गुजरातमधील या वैशिष्टय़पूर्ण लीपन घरांची शैली मुंबईतील गोरेगावातील अक्षय आणि अनुप येवगे यांनी त्यांच्या घरघुती गणपतीसाठी साकारलेल्या देखाव्याचा स्वरुपात पहायला मिळतेय . येवगे कुटुंबाने त्याच्या घरात लीपन शैलीतील घर साकारल असून या घराच्या भिंती कच्छच्या रणातील रेतीसारख्या पांढर्या असून त्यावर स्थानिक आदिवांसीची चित्रशैली देखील साकारण्यात आलीय. कच्छच्या रणातील घरामधे असणाऱ्या सर्व वस्तु या ठिकाणी पहायला मिळतायत आणि या घरामधे येवगे कुटुंबाने त्यांच्या घरातील पर्यावरण पूरक लाल मातीचे बाप्पाला विराजमान केलय. विशेष म्हणजे बाप्पाच्या शेजारी येवगे कुटुंबीयांकडून गौरी बसून आणि गौरीला देखील सुंदर सजावट करण्यात आली आहे...