Balasaheb Thorat | थेट मुख्यमंत्र्यांना दोष देणं चुकीचं : बाळासाहेब थोरात | ABP Majha
Continues below advertisement
ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लहान मुलीसह पोलीसांनी जबरदस्तीने मातोश्रीबाहेरुन ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याच नाव देशमुख असून ते आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यांना भेटण्यास नकार देत पोलीसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. या शेतकऱ्याला पोलीसांनी ठाण्यात बसवून ठेवलं होतं. मात्र, कोणत्याही माध्यम प्रतिनिधीस संवाद साधण्यास मज्जाव केला. दरम्यान, पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. संबंधीत शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करुन त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले.
Continues below advertisement