
Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
मुंबई : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जात आहे. केंद्रीय आस्थापनांच्या समोर कांदा निर्यातबंदीविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. याबाबत थोरात यांनी म्हटलं आहे की,मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असून केंद्र सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत, असं थोरात म्हणाले.
Continues below advertisement