Balasaheb Thackeray Death Anniversary :शिवसेनाप्रमुखांचा नववा स्मृतिदिन,शिवाजी पार्कवर शिवसैनिक दाखल

Continues below advertisement

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी  निर्बंध उठवण्यात आल्यानं शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर येऊ शकले नव्हते. परंतु, यावर्षी निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. 

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram