Badlapur : बदलापूरात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली; गेल्या 9 तासांपासूून उद्यान एक्स्प्रेस बदलापूर स्थानकात अडकली

बदलापुरातील रेल्वेचे ट्रॅक. मुसळधार पावसानं यंदाही बदलापूरात ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. ट्रॅकवर जवळपास २-३ फूट पाणी साचलंय. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस ज्या ठिकाणी अडकली होती त्या ठिकाणी यंदाही ट्रॅकवर नदी वाहत असल्याचा भास होतोय. गेल्या वर्षीच्या याच घटनेतून शहाणं होत रेल्वे प्रशासनानं आज सिद्धेश्वर एक्स्प्रेस बदलापुरात न थांबवता पुढे नेली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अन्यथा गेल्यावर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका होता. सध्या रेल्वे वाहतूक पूर्ण पणे ठप्प असून अजूनही पाऊस बरसत असल्यानं पाणी कधी ओसरेल याचा नेम नाही. इकडे बदलापूर शहरातही काही वेगळी स्थिती नाही. बदलापूरच्या वेस्टला असलेल्या भागातल्या दिपाली सोसायटीमधील  ही दृष्य आहेत, संपूर्ण परिसरात पाणी साचल्यानं या भागाच तळं झालंय. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola