Badlapur Crime News : बदलापूरमधील नराधमाच्या कोठडीत वाढ, 26 ऑगस्टपर्यंत अक्षयला कोठडी
Continues below advertisement
Badlapur Crime News : बदलापूरमधील नराधमाच्या कोठडीत वाढ, 26 ऑगस्टपर्यंत कोठडी
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले.यावेळी त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये... दरम्यान या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिलाय.
Continues below advertisement