Megha Ghadge | मराठी अभिनेत्री मेघा घाडगेच्या फेसबूकवर अश्लील भाषेत कमेंट | ABP Majha
मराठी अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबूकवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या तरुणाविरोधात मिरा रोडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र याबाबत तक्रार करायला गेलेल्या मेघा यांना पोलिसांचा वाईट अनुभव आला. जवळपास सव्वातास थांबवून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप मेघा घाडगेनं केलाय.. मात्र नंतर ओळखीच्या माध्यमातून रात्री गुन्हा दाखल करुन घेण्यात आला.
मीरा रोडच्या ाहणाºया मेघा यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर एका मराठी चित्रपटातील लावणी नृत्य प्रसंगाचे सहकलाकारासोबतचे छायाचित्र पोस्ट केले होते. सरुप पांडा नावाच्या फेसबूक खातेधारकाने अतिशय अश्लील प्रतिक्रिया लिहिल्या होत्या.