Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर कळव्यात शाईफेक

Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर कळव्यात शाईफेक

Ayodhya Pol:  शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. ठाणे-कळवा (Thane Kalwa) मनिषा नगर भागात ही घटना घडली. एका कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र, हा कार्यक्रम एक बनाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. मात्र, शाईफेक करत पोळ यांना मारहाण कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या प्रकारावरून ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचे म्हटले जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola