Aurangabad : शिवसेनेच्या आमदारावर राष्ट्रवादीचा निशाणा, आमदारांना घरं देण्याच्या मुद्यावर आंदोलन
Aurangabad : मुंबईत आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर टीका होत असताना या मुद्यावर औरंगाबादमध्ये कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्याविरोधात आंदोलन सुरु झालंय. कारण आमदार उदयसिंग राजपूत यांनी मुंबईत सदनिका मिळावी अशी मागणी केली होती. या मागणीला त्यांच्या मतदार संघातून राष्ट्रवादीने विरोध केला आहे. उदयसिंग राजपूत यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे ते मुंबईत घर घेऊ शकत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कन्नड शहरात भीक मागो आंदोलन केलं.