Bandra New Year Celebration : वांद्रे रिक्लेमेशनवर आकर्षक विद्युत रोषणाई
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत... त्यामुळे सगळेच सध्या पार्टी मोडमध्ये असल्याचं दिसतंय...सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत एकदम धुमधडाक्यात करण्याची तयारी पुर्ण झालीये. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.. पर्यटकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय...तर वांद्रे रिक्लेमेशनवर सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये. त्यामुळे मुंबईकरांनी आणि मुंबई बाहेरच्याही पर्यटकांनी याठिकाणी हजेरी लावलीये. तर नवी मुंबई पालिकेलाही विद्युत रोषणाई कऱण्यात आलीये.
Tags :
New Year Gateway Of India Mumbaikars Farewell Welcome MUMBAI Joy Crowd Of Tourists Electric Lighting Atmosphere Of Excitement