Attack on Police | मुंबई, अंबरनाथमध्ये पोलिसांवर हल्ला; कायद्याचा धाक आहे की नाही?
कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. तर अंबरनाथमध्ये टोळक्याने एका पोलिसाच्या डोक्यावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. त्यामुळे वर्दीवर हात उचलणाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण
मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसाने तिला रोखत कारवाई केली. परंतु पोलिसाने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेने पोलिसांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाण प्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि तिचा मित्र मोहसीन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्ये पोलिसावर तलवारीने वार
पोलीस स्टेशनबाहेरच पोलिसावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना काल (23 ऑक्टोबर)अंबरनाथमध्ये घडली होती. वाहतूक कोंडीवरुन झालेल्या वादातून चार जणांनी पोलिसावर तलवारीने हल्ला करुन पसार झाले आहेत. या घटनेत पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.