Ashok Saraf on Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषेसारखी दुसरी कोणतीही भाषा समृद्ध नाही
पुण्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान सोहळा पार पडला.. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते..नुकताच अशोक सराफ यांना राज्य शासनाकडून महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला.. त्यापार्श्वभूमीवर अशोक सराफ यांची कारकीर्द, त्यांचा प्रवास आणि अनुभव यासर्व विषयांवर अभिनेत्री सायली संजीव हीने त्यांची मुलाखत घेतली.. यावेळी मराठी भाषा ही फारच ग्रेट आहे..मराठी भाषेसारखी दुसरी कोणतीही भाषा समृद्ध नाही अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी दिली..