Ashok Naigaonkar यांच्या पंचाहत्तरीनिमित्तानं कार्यक्रम, कवितेच्या वाटेवर या कवितासंग्रहांचं प्रकाशन
Continues below advertisement
कवी अशोक नायगावकर यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्तानं ग्रंथालीच्या वतीनं एका कलंदराची पंचाहत्तरी या कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. नायगावकरांच्या सन्मानार्थ आयोजित हा कार्यक्रम दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह महेश केळुस्कर, ना धों महानोर, नीरजा, अशोक बागवे आणि श्रीकांत बोजेवार आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रीकांत बोजेवार यांनी सन्मानपत्राचं वाचन केलं. नायगावकरांच्या वाटेवरच्या कविता आणि कवितेच्या वाटेवर या कवितासंग्रहांचं आणि नायगावकर वगैरे वगैरे या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं.
Continues below advertisement