Dahi Handi : आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ शेलारांचं लक्ष्य, जांबोरी मैदानात भाजपची मोठी दहीहंडी
Continues below advertisement
राजकीय बातमी आहे मुंबईतून. आशिष शेलार यांनी मुंबई भाजपची जबाबदारी स्वीकारली आणि थेट आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलंय. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलंय. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागतंय. एकूणच दहीहंडीवरून वरळीत राजकीय काला घडण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement