Mumbai Vacant Flats : महामुंबई परिसरात तब्बल 8 लाख घरं आजही विक्रीविना पडून
Continues below advertisement
चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या व्याजदरवाढीचा फटका आता घरांच्या विक्रीवर होण्यास सुरुवात झाली आहे. महामुंबई परिसरात तब्बल ८ लाख घरं आजही विक्रीविना पडून आहेत. बांधकाम उद्योगातील महत्त्वपूर्ण अशा क्रेडाई या संस्थेने महामुंबई परिसरासाठी केलेल्या एका पाहणी अहवालाद्वारे ही माहिती मिळाली आहे. विद्यमान आर्थिक वर्षात महामुंबई परिसरात आतापर्यंत केवळ ३३ हजार ७१४ घरांचीच विक्री झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, महामुंबई परिसरात सध्या ८ लाख घरे विक्रीविना पडून असल्याने अनेक बांधकाम उद्योजकांनी नवे बांधकाम प्रकल्पही पुढे ढकलले आहेत. घरांची विक्री मंदावण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे वाढलेले व्याजदर. दुसरं कारण म्हणजे मागणी घटूनही घरांच्या किमती मात्र कमी होत नाहीयेत. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरं महाग झाली आहेत.
Continues below advertisement
Tags :
Report Construction Financial Year Projects Inflation Interest Rate Rise Home Sales Greater Mumbai Area Falling Without Sales Construction Industry