Aryan Khan च्या जामीन अर्जावर आज सुनावणी, ड्रग्जचं सेवन, खरेदी-विक्री केल्याचा आरोप
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कालची रात्र आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.