Aryan Khan Bail Plea Hearing : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी, सुटका होणार?
Aryan Khan Bail Plea Hearing : क्रूझ ड्रग प्रकरणी अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाचं कामकाज संपल्यानं या प्रकरणाची सुनावणी आता आज (बुधवारी) घेतली जाणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.
आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्यानं ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीनं अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडलं. त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही. अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं, असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी काल सुनावणी दरम्यान कोर्टात केला.