Arvind Kejriwal Speech BKC MVA :जेलमध्ये इन्सुलिन दिलं नाही, CCTV लावले,ठाकरेंसमोर केजरीवालांचं भाषण

Continues below advertisement

मुंबई : दिल्लीतील लोकांसाठी मी अनेक रुग्णालयं निर्माण केली, मोफत उपचार दिले, पण जेलमध्ये टाकल्यानंतर मोदींनी मला इन्सुलिनचे औषधही दिलं नाही असा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. 4 जून रोजी मी जेलमध्ये असणार आहे, तिथून देशाचा निकाल पाहणार, त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर मोदींनी नाकारलं पाहिजे असंही अरविंद केजरीवाल यांनी आवाहन केलं. अरविंद केजरीवाल हे महाविकास आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करत होते. 

अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

थेट तुरुंगातून तुमच्याकडून आलोय, जेलचे उत्तर व्होटने द्यायचे. मी झोळी पसरवून तुमच्याकडे भीक मागायला आलोय या देशायाला वाचवायला. हे देश आणि लोकशाही संपवण्याचे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत.  

दिल्लीमध्ये 70 मधील 67 जागा 'आप'ला मिळाल्या होत्या. नंतर 62 मिळाल्याआणि भाजला 8 जागा मिळाल्या. 'आप'ला हरवू शकणार नाही हे लक्षात आल्याने खोटे गुन्हे दाखल करून सिसोदिया, मला अटक केली.  त्यांना वाटल मी राजीनामा देईन मी तुरुंगातून राज्य चालवताचा निर्णय घेतला.

लोकशाहीला जर ते तुरुंगात टाकत असतील तर आन्ही तुरुंगातून राज्य चालवू. मी दिल्लीतील गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला अटक केली. 

तुमच्या मनाचा मोठेपणा यात होता की मी जर शेकडो शाळा काढल्या तर तुम्ही हजारो शाळा काढायला पाहिजे होतात. मी शेकडो हास्पिटल काढले, पण पंधरा दिवस तुरुंगात असताना माझे औषध मोदींनी बंद केले. माझं शुगर तीनशे पर्यंत गेलं, पण मला इन्सुलिन दिलं नाही. इन्सुलिन मिळालं नाही तर किडनी खराब होते. मला माहिती नाही त्यांना माझ्यासोबत काय करायचे होते. 

मी दिल्लीत वीज बिल फ्री केलं, तुम्ही देशभरात हे करायला हवे होते.  पण तुम्ही मला अटक केली . 

मी 2 जूनला पुन्हा तुरुंगात जाईन असं ते म्हणतायत, आता हे तुम्ही ठरवायचं आहे.  मोदींना मत दिले की मी तुरुंगात जाईन आणि इंडियाला दिले की मी आझाद राहीन.  

रशियामध्ये विरोधकांना अटक केली आणि मोठ्या प्रमाणात पुतीनला मतं मिळाली. 

मोदींना भारताला बांगलादेश आणि पाकिस्तान करायचे आहे. निवडणुकीच्या एक महिना पूर्वी काँग्रेसचे अकाउंट सील केले. आता आमचे अकाउंट सील करण्याची तयारी सुरू केलीय.  

तुमच्यामध्ये दम असेल तर डोळ्यात डोळे घालून निवडणूक लढा. 

वन नेशन वन लीडरसाठी मोदी काम करत आहेत. त्यासाठी विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. जर मोदी यामध्ये जिंकले तर उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी हे सगळे तुरुंगात असतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram