APMC Election | नवी मुंबई एपीएमसी निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला; आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत
नवी मुंबई एपीएमसीसाठी आज निवडणूक होत आहे. सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झालीय. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत आहे. मुंबई वगळता सहा महसूल विभागांत ही निवडणूक होत आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. तर, दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. मुंबई एपीएमसी संचालकपदाच्या एकूण 18 जागांसाठी ही लढत होत आहे. यात आता 58 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.