मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज
Continues below advertisement
मुंबई: कोरोनाचे बदलत असलेले रुप, समोर येऊ लागलेले डेल्टा व्हेरियंटसारखे नवीन प्रकार आणि त्यामुळं राज्यभरात पुन्हा एकदा घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये (Mumbai third sero survey) 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. मुंबईतील 24 वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटांतील लहान मुलांचा सर्व्हे केला होता.
Continues below advertisement